खानापूर:कोणत्याही कागदपत्राशिवाय वाहतूक करण्यात येत असलेली 7 लाख 98 हजार रोख रक्कम आज् सकाळी साडे आठ वाजता खानापूर विधानसभा मदारसंघातील कणकुंबी तपासणी नाक्यावर जप्त करण्यात आली. ही कारवाई एस एस टी पथकाकडून करण्यात आली आहे.बैलहोंगलचे रहिवासी संजय बसवराज रेड्डी हे , के ए 29H 1532 क्रमांकाच्या वाहनातून गोव्याहून बेळगावला जात असताना वाहनाची तपासणी केली असता वाहनात कोणत्याही कागद पत्राशिवाय वाहतूक करण्यात येत असलेली 7 लाख 98 हजार इतकी रोख रक्कम आढळून आली. ही कारवाई एसएसटी पथकाने केली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम खानापूर उपकोषागार कार्यालयात ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती एसएसटी पथकाचे अधिकारी मलगौडा पाटील यांनी खानापूर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना दिली आहे.
Previous Articleहरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त
Next Article अवैध दारू विक्रेत्याला सीसीबी पोलिसांनी केली अटक