उत्तराखंडमध्ये दुर्घटना, गुजरातमधील पर्यटक
वृत्तसंस्था/ डेहराडून
उत्तराखंडमध्ये रविवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. गंगोत्री महामार्गावर गंगनानीजवळ पर्यटक व भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला. तसेच 27 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले होते. गुजरातमधील पर्यटकांची बस 34 प्रवाशांसह गंगोत्रीहून उत्तरकाशीच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली. पोलिसांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबविले. जखमींना 108 ऊग्णवाहिकेने उपचारासाठी ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.









