वार्ताहर / केपे
पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या तिसऱया दिवशी केपे तालुक्मयातून सात अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत 14 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. बुधवारी मळकर्णे पंचायतीतून 1 अर्ज, शेल्डे पंचायतीतून 2 अर्ज, फातर्पा पंचायतीतून 2 अर्ज, अवेडे कोठंबी पंचायतीतून 1 अर्ज, तर आंबावली पंचायतीतून 1 अर्ज सादर करण्यात आला. आतापर्यंत सर्वाधिक 6 उमेदवारी अर्ज फातर्पा पंचायतीतून आले आहेत, तर बार्से, बाळ्ळी, बेतूल, कावरेपिर्ला या पंचायतींतून अजून अर्ज आलेले नाहीत.









