वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियामध्ये शनिवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. कामचटकाच्या पूर्व किन्रायाजवळ झालेल्या हादऱ्यांनी रशियाची भूमी हादरली. त्याची तीव्रता भूकंपमापन यंत्रावर 7.4 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचे केंद्र पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्कीपासून 111.7 किलोमीटर पूर्वेला होते. या भूकंपाची खोली 39 किलोमीटर होती. या भूकंपामुळे सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तथापि, कोठेही मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद आढळून आलेली नाही. याच भागात यापूर्वीही मोठा भूकंप झाला होता. त्या भूकंपाची तीव्रता 8.8 होती. रशियामध्ये झालेल्या भूकंपामुळे अमेरिका आणि चीनमध्येही घबराट निर्माण झाली आहे.









