वृत्तसंस्था/ सँटियागो
चिली आणि अर्जेंटिनामध्ये शुक्रवारी 7.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला. सुदैवाने भूकंपानंतर कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मात्र, चिलीच्या प्रशासनाने देशाच्या दक्षिणेकडील मॅगेलन सामुद्रधुनीच्या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अलर्ट जारी केला आहे. सुनामीच्या इशाऱ्यामुळे मॅगालेन्स प्रदेशातील किनारी भागात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे चिलीच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि प्रतिसाद सेवेने जनतेला पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. चिली अंटार्क्टिक प्रदेशातील सर्व समुद्रकिनारी क्षेत्रे सोडण्याची विनंतीही या संदेशात करण्यात आली आहे.









