कोल्हापूर :
साठीनंतर माणसाच्या उतार वयाला खऱ्या अर्थाने सुऊवात होते. जस जसे वाढत जाते तसे आरोग्याच्या तक्रारी, सांधेदुखीचा त्रास आणि हाडांच्या समस्या यापैकी एका समस्येला तरी अनेकांना तोंड द्यावे लागते. मात्र वयाच्या सत्तरीच्या समिप असलेले हुपरी (ता. हातकणंगले) येथील 69 वर्षीय दीपक पाटील अपवाद ठरत आहेत. त्यांनी कोल्हापूर ते अयोध्या असा 1 हजार 750 किलोमीटरचा सायकलने प्रवास कऊन शरीराची तंदुऊस्ती दाखवून दिली आहे.
कोल्हापूर ते अयोध्या असा दुसऱ्यांदा सायकलने प्रवास करताना त्यांनी विविध गावांमधील जनमाणसांना शरीर तंदुरुस्तीसाठी आणि निरामय, आनंदी जीवनासाठी व्यायाम करा, भरपूर सायकल चालवा, असा संदेशही दिला आहे. दरम्यान, दीपक पाटील यांनी 21 हजार किलोमीटर सायकल सफर करण्याचा संकल्प सोडला आहे. आपल्या संकल्पस्पुर्ती त्यांनी दुसऱ्यांदा कोल्हापूर ते अयोध्या असा सायकल प्रवास केला आहे. तसेच आजवर 21 हजारपैकी तब्बल 18 हजार 500 किलोमीटरचा नेटाने सायकल प्रवास कऊन समाजासमोर आपल्या चांगल्या व तंदुऊस्त आरोग्याचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी जम्मू–काश्मीर, कन्याकुमारी, काशी, नागपूर, रायपूर, रांची, हजारेगाव, शिकरजी, माऊंट आबू (राजस्थान), शेंगाव, पंढरपूर, वाराणसी, गुजरात, तिरुपती यासह देशातील 60 टक्के पेक्षा जास्त ठिकाणी सायकलने भेटी दिल्या आहे. ते गेल्या सहा वर्षापासून ते केवळ आणि केवळ सायकलने प्रवास करताहेत.
वाकरे (ता. करवीर) येथून त्यांनी 7 नोव्हेंबरला अयोध्याकडे सायकलने प्रयाण केले होते. आमदार अमल महाडिक आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे यांच्या उपस्थितीत सायकल सफरीला त्यांनी सुऊवात केली होती. संपूर्ण प्रवासात ते पेट्रोल पंपावरील जागेत वस्ती करत होते. धाब्यावर दुपारी व रात्रीचे जेवणे घेत होते. तसेच संपूर्ण दिवसभर सायकल चालवत विविध गावांमध्ये जाऊन जनमाणसांना व्यायाम करा, तंदुरुस्त, निरामय आणि आनंदी जीवनासाठी सायकल चालवा असा संदेश देत होते. मोठा प्रवास कऊन कोल्हापुरात आल्यानंतर पाटील यांचे मित्र बंडोपंत चव्हाण, श्रीकांत हिरवे, उमाजी पाटील, शीतल पाटील, देवराज पाटील, किरण पोवार, विद्या पाथरे, अनिल साळोखे व अनिल कुंभार यांनी स्वागत केले. दरम्यान, आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पाटील हे 50 किलो मीटरची सायकल सफर करतात. तसेच वर्षातून महिना–दीड महिना ते सायकल मोहिमही हाती घेतात.








