नोंदणी केलेल्यांपैकी 60 टक्के व्यक्तींनी घेतली लस – डॉ. खलिपे
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना लसीकरणला 16 जानेवारीला सुरुवात झाल्यापासून गेल्या महिनाभरात 6 हजार 820 जणांनी कोरोना लस घेतली आहे. नाव नोंदणी केलेल्या व्यक्तींपैकी 60 टक्के व्यक्तींनी लस घेतली आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
कोरोनावर कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लस आल्यानंतर 16 जानेवारीला कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य अधिकारी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात आली. त्यानंतर महसूल व पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनीही लस घेतली. आता ग्रामसेवक व सरपंच यांना लस देण्यात येत आहे.
जिल्हय़ात एकूण नऊ लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येत आहे. या सर्व केंद्रांवर गेल्या महिनाभरात 17 फेब्रुवारीपर्यंत 6 हजार 820 जणांना लस देण्यात आली. नाव नोंदणी केलेल्यांपैकी 60 टक्के व्यक्तींनी लस घेतली.
जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी 1397, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय 1201, कणकवली उपजिल्हा रुग्णालय 1534, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय 273, मालवण ग्रामीण रुग्णालय 695, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय 444, देवगड ग्रामीण रुग्णालय 601, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय 365, वैभववाडी ग्रामीण रुग्णालय 410 याप्रमाणे नऊ केंद्रांवर कोरोना लस देण्यात आली आहे.









