पुलाची शिरोली / वार्ताहर
माजी आमदार महादेवराव महाडिक, उद्योगपती स्वरुप महाडिक, चेअरमन दिलीप पाटील यांनी पुलाची शिरोलीत मतदानाचा हक्क बजावला.तर माजी आमदार अमल महाडिक यांनी पेठवडगाव येथे तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी शिये येथे मतदानाचा हक्क बजावला. पुलाची शिरोलीत एकूण ९६४ मतदार . त्यापैकी अकरा वाजेपर्यंत ५७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सत्ताधारी राजर्षी छत्रपती शाहू सहकार आघाडीचे प्रमुख महादेवराव महाडिक हे संस्था गटातून, माजी आमदार अमल महाडिक व चेअरमन दिलीप पाटील हे व्यक्ती गटातून निवडणूक लढवत आहेत.तर विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या परिवर्तन आघाडीतून बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवत आहेत.









