113 वर्षे जुने चर्चे स्थलांतरित
जर तुमच्या शहराचा मानबिंदू, एखादी इमारत अचानक धोक्यात आल्यास काय कराल? स्वीडनच्या किरणा शहरात 113 वर्षे जुनी प्रसिद्ध किरुना चर्च आणि त्याचे घंटाघर आता विशाल ट्रेलर्सवर चढवून 5 किलोमीटर अंतरावर नव्या जागेत हलविण्यात आले आहे. यामागील कारण जगातील सर्वात मोठ्या अंडरग्राउंड आयर्न ओरे खाणीचा विस्तारा आहे.भारतातही जेव्हा खाणप्रकल्पांची व्याप्ती वाढते तेव्हा आसपासच्या वसाहती निर्जन होतात. खाणीखाली जमीन खचू लागल्याने स्वीडनच्या या शहरातील घरे आणि रस्त्यांना तडे गेले, आता पूर्ण शहर हळूहळू नव्या ठिकाणी हलविण्यात येत आहे. जेणेकरून खाणीत 1365 मीटर खोलवर खनन करता येईल आणि शहर सुरक्षित राहिल.
किरुना चर्चला 2001 मध्ये स्वीडनच्या जनतेने 1950 पूर्वी निर्मित सर्वात चांगली इमारत म्हणून निवडले होते. याला सामी (स्थानिक आदिवासी समुदाय)च्या शैलीत निर्माण करण्यात आले होते, जेणेकरून येथील लोक स्वत:ची सांस्कृतिक ओळख जाणवून घेऊ शकतील. हा चर्च येथील लोकांच्या श्रद्धा आणि वारशाचे प्रतीक आहे.
दोन दिवसांपर्यंत चालला प्रवास
672 टन वजनी आणि 40 मीटर रुंद हे चर्च साधारण इमारत नाही. याला स्थलांतरित करण्यासाठी रस्त्यांना रुंद करावे लागले. एक वायाडक्ट तोडावे लागले आणि खास ट्रेलर तयार करण्यात आले. दोन दिवसांपर्यंत हा चर्च ट्रेलर्सवर सवार होत हळूहळू 0.5-1.5 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने नव्या ठिकाणी पोहोचला.
भव्य आयोजन आणि थेट प्रसारण
या चर्चला स्थलांतरित करण्याचे काम केवळ इंजिनियरिंगचा चमत्कार राहिला नाही, तर याला राष्ट्रीय आयोजनाचे स्वरुप देण्यात आले. स्वीडनचे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ स्वत: उपस्थित राहिले. देशाच्या यूरोविजन टीमने संगीत सादरीकरण केले आणि राष्ट्रीय टीव्ही चॅनेलने याला ‘द ग्रेट चर्च वॉक’ नावाने लाइव्ह दाखविले.









