मुंबई :
रिटेल क्षेत्रातील कंपनी डीमार्टने आपला जून 2023अखेर संपलेल्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहीर केला असून 658 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये डीमार्टने 642 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. डीमार्टचे संचालन करणाऱ्या एव्हेन्यू सुपर मार्केटच्या महसुलामध्येदेखील 18 टक्के इतकी वाढ झाली असून जून अखेरच्या तिमाहीमध्ये 11 हजार 865 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. एक वर्षाच्या आधी समान अवधीमध्ये 10 हजार 38कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता.









