ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील कलाकारांना आणि क्रू मेंबर्सना स्टुडिओ किंवा आऊटडोअर सेटवर काम करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने मनाई केली होती. या निर्णयाविरोधात कलाकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने मालिका-चित्रपटाच्या सेटवर काम करण्याची परवानगी दिली आहे.
सरकारने जारी केलेले दोन ठराव मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. चित्रपट व टीव्ही कलाकार प्रमोद पांडे (70) आणि इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशनच्या वतीने वकील अशोक सरोगी यांच्यामार्फत दाखल केलेल्या दोन याचिकांवर खंडपीठाने निर्णय दिला.
65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी लागू असलेल्या इतर सर्व नियमावली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम करणाऱ्या पासष्टीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांनाही लागू असतील, असेही न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि आर. आय. चगला यांच्या खंडपीठाने सांगितले.