वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतामध्ये 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिकचा खर्च आणि भारतामधील केंद्रनिवडीची आराखडा जारी करण्यात आला आहे. मागील वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकचा खर्च पाहता भारताला 32,765 कोटी जादा मोजावे लागणार आहेत. आर्थिक fिनयोजनाप्रमाने भारताला 34,700 ते 64,000 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. भारतामधील गुजरात, मुंबई, पुणे, गोवा, भोपाळ येथे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेमधील मुख्य ठिकाण गुजरातमधील अहमदाबाद राहणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमजवळ असणाऱ्या 650 एकर जमिनीचे ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आले आहे. या 650 एकर जमिनीत वादग्रस्त आसप्रामबापू यांच्या आश्रमाचाही समावेश आहे, याशिवाय भारतीय सेवा समाज, सदाशिव प्रज्ञा मंडळ या आश्रमांनाही स्थलांतरचा आदेश देऊन भाडे तत्वावर जागा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदाबाद महानगरपालिकेचे आयुक्त, अहमदाबादचे जिल्हाधिकारी, अहमदाबादचे शहरी विकास प्रधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीने नरेंद्र मोदी स्टेडियम भोवतील जमीन संपादनाच्या तयारीला सुरुवात केली आहे. शिवनगर आणि वाझरावास येथील भूसंपादनाचा आदेश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिला आहे. अहमदाबादच्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे भाट, मोटोरा, कोटेश्वर, सुगाडमधील 600 एकर आणि साबरमती नदीकाठ परिसरातील 50 एकर जमिनीचा भाग अशा एकूण 650 एकर जमिनीच्या मास्टरप्लानची सुरुवात करण्यात आली आहे. गुजरातबरोबर
मुंबई, पुणे, गोवा, भोपाळ यांनाही स्पर्धेच्या तयारीकरीता आदेश देण्यात आले आहेत. ऑलिम्पिक समितीचे नूतन अध्यक्षा क्रिर्स्टा कॉवेंट्री भारतामध्ये होणाऱ्या 2036 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे नियोजन, नियमावली या संदर्भात पुढील म्&हिन्यात पत्रकार परिषदेत सांगण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.









