टीना मुनीमच्या प्रेमात होता संजय दत्त
बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीत 64 वर्षांची झाली आहे. 11 फेब्रुवारी 1957 रोजी मुंबईतील एका गुजराती कुटुंबात जन्मलेली टीना 9 बहिणींमध्येत सर्वात लहान होती. बालपणापासून ग्लॅमर वर्ल्डमध्ये सामील होण्याचे तिचे स्वप्न होते. वयाच्या 21 व्या वर्षी ‘देस परदेस’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱया टीनाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले, पण ही अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिली. विशेषकरून संजय दत्तशी असलेले अफेयर अधिक चर्चेत राहिले होते.
दोघेही बालपणीचे मित्र होते. दोघांनीही महाविद्यालयीन शिक्षणही एकत्रच पूर्ण केले. सदैव व्यसनांमध्ये गुरफटलेल्या संजयमुळे टीना अत्यंत नाराज असायची. तिने संजय दत्तसाठी स्वतःची कारकीर्दही पणाला लावली होती. अनेकदा समजावूनही संजयच्या वर्तनात फरक न पडल्याने टीनाने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत संजयने टीनासोबतच्या प्रेमाची कबुली दिली होती. 1981 मध्ये रॉकी प्रदर्शित होण्यापूर्वी 1980 मध्ये ऋषि कपूर यांचा ‘कर्ज’ प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपटांत टीनाच अभिनेत्री होती. ऋषि आणि टीना यांचे अफेयर असल्याचा संशय बळावल्याने संजयेन गुलशन ग्रोवरसाब्sात मिळून ऋषिला मारझोड करण्याचा कटही रचला होता. पण नशेत असलेला संजय दत ऋषि कपूरच्या घराच्या दिशेने जात असताना वाटेत त्याला नीतू सिंग मिळाली होती. नीतूने अनेकदा समजाविल्यावर संजयने स्वतःचा हट्ट सोडला होता.









