स्वतःपेक्षा 12 वर्षे लहान असणाऱया सैफसोबत विवाह, 13 वर्षांमध्ये संपुष्टात आले होते नाते
बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग 63 वर्षांची झाली आहे. अमृताने सैफ अली खान याच्यासोबत विवाह केला होता, पण दोघेही आता विभक्त झाले आहेत. दोघांचेही नाते संपुष्टात आले असले तरीही सैफ एकेकाळी अमृतावर पूर्णपणे फिदा झाला होता.
सैफ आणि अमृता यांची पहिली भेट ‘ये दिल्लगी’च्या सेटवर झाली होती. दोघेही एका फोटोशूटकरता एकत्र आले होते. 3 महिन्यांच्या डेटनंतर सैफ आणि अमृताने 1991 मध्ये लपून गुप्त विवाह केला होता. दोघेही स्वतःच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेला घाबरत होते. सैफ आणि अमृता यांच्यातील वयाचे अंतर यासाठी कारणीभूत होते. अमृता सैफपेक्षा सुमारे 12 वर्षांनी मोठी होती.
13 वर्षांनी विभक्त
13 वर्षांपर्यंत परस्परांना साथ दिल्यावर हे दांपत्य 2004 मध्ये विभक्त झाले होते. सैफ आणि अमृता यांना सारा आणि इब्राहिम ही दोन अपत्ये आहेत. अमृताला सोडचिठ्ठी दिल्यावर सैफने 3 वर्षांपर्यंत स्वीस मॉडेल रोजा कॅटलानोसोबत डेटिंग केले, पण हे नाते दीर्घकाळ चालू शकले नाही. 2007 मध्ये ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर सैफची करिना कपूरशी भेट झाली. दोघेही 5 वर्षांपर्यंत डेट करत राहिले. त्यांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी विवाह केला. दोघेही आता एका मुलाचे पालक आहेत. करिना लवकरच दुसऱया अपत्याला जन्म देणार आहे.









