वृत्तसंस्था /सेनेगल
पश्चिम आफ्रिकेतील केप वर्दे बेटांच्या किनाऱ्यावर सेनेगलमधून स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटून 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने ही माहिती दिली. या दुर्घटनेत 63 जणांचा मृत्यू झाला असून 38 जणांना वाचवण्यात यश आल्याचे ‘आयओएम’च्या प्रवक्त्या सफा मशेली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मृतांमध्ये यामध्ये चार मुलांचा समावेश आहे. केप वर्दे बेटांपासून सुमारे 150 नॉटिकल मैल (277 किलोमीटर) अंतरावर अटलांटिक महासागरात ही दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य राबविण्यात आले. बोटीने 10 जुलै रोजी सेनेगलमधील फासे बोये येथून 101 जणांसह प्रवास सुरू केला होता.









