इक्वेस्ट्रियन इव्हेन्टिंग टीममध्ये रौप्यपदकाची कमाई, हॉय यांच्यासाठी 5 वे ऑलिम्पिक पदक
ऑस्ट्रेलियाचे ऍन्ड्रय़ू हॉय सोमवारी इक्वेस्ट्रियन इव्हेंटिंग टीम कॉम्पिटिशनमध्ये रौप्य जिंकल्यानंतर 1968 नंतरचे पहिलेच वयस्कर ऑलिम्पिक पदक विजेते ठरले. हॉय सध्या 62 वर्षांचे असून ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठावर त्यांनी आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत. यातील 3 सुवर्णपदके आहेत. सिडनी 2000 नंतरचे मात्र त्यांचे हे पहिलेच पदक आहे.
ऍन्ड्रय़्रू हॉय यांनी 1992 मध्ये पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले होते. अर्थात, ते 62 वर्षांचे असल्याने अनेक लोक त्यांना ऑलिम्पिकमध्ये ऑफिशियल म्हणून जात आहात का, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. हॉय अजूनही ऍथलिट म्हणून सहभागी होत आहेत, यावर त्यांचा विश्वासही बसत नाही. यापूर्वी 1968 मध्ये मेक्सिको ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर स्वित्झर्लंडच्या लुईस नोव्हेरेझ यांनी सेलिंगमध्ये रौप्य जिंकले होते. नोव्हेरेझ त्यावेळी 68 वर्षांचे होते.









