चांदी दरही 75 हजारांच्या आसपास : महागाई, जागतिक मागणीचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई, नवी दिल्ली
सोने आणि चांदी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी बुधवारी उच्च पातळीला स्पर्श केला. सोन्याच्या किमतीने प्रतितोळा (10 ग्रॅम) 61,000 ऊपयांच्या वरची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. तसेच चांदीची किंमतही 75,000 रुपयांच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे गेली आहे. सोने-चांदी दरातील हा आतापर्यंतचा उच्चांक असून देशातील वेगवेगळ्या शहरांमधील दर यापेक्षाही अधिक आहेत.
सोन्याने ऐतिहासिक पातळी गाठली असून जागतिक बाजारातील वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. सोन्याने बुधवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी नवा विक्रम गाठला. ‘गुड रिटर्न्स’च्या वेबसाईटनुसार, बुधवारी मुंबई सराफा बाजारात सोने 1,030 रुपयांनी महाग होऊन 61,360 ऊपयांवर पोहोचले आहे. याशिवाय चांदीनेही प्रतिकिलो 77 हजारांचा टप्पा पार केला आहे. ‘गुड रिटर्न्स’नुसार बुधवारी मुंबई सराफा बाजारात चांदी 2,490 रुपयांनी महाग होत 77,090 ऊपयांवर पोहोचली. यापूर्वी मंगळवारी हा दर 74,600 प्रतिकिलो या उच्चतम पातळीवर होता.
‘एचडीएफसी सिक्मयुरिटीज’च्या अहवालानुसार जागतिक परिणामांमुळे बुधवारी दिल्ली या राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 1,025 रुपयांनी वाढून 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चांकावर पोहोचला. यापूर्वी मंगळवारी हा दर 60,055 ऊपये प्रतितोळा इतका होता. ‘एचडीएफसी सिक्मयुरिटीज’नुसार दिल्लीत चांदीचा भावही 1,810 रुपयांनी वाढून 73,950 रुपये प्रतिकिलो झाला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीने प्रतितोळा 61 हजार रुपयांची पातळी ओलांडल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटी कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी दिली.









