सर्व जण परस्परांचे नातलग
पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात स्वत:च्या भौगोलिक आणि सामाजिक स्थितीनुसार वेगवेगळे नियम कायदे लागू करण्यात आले आहेत. यातील काही गोष्टींना परंपरा मानले जाऊ लागले. युनायटेड किंगडम येथील एका बेटावर एकूण 600 जण राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे येथे राहणारे सर्व लोक कुठल्या न कुठल्या पद्धतीने परस्परांशी संबंधित आहेत. या ठिकाणी लोकांचे परस्परांशी नातलग असणे समस्या नसून अन्य समस्या त्यांना दररोज त्रास देत आहे.
या बेटाचे नाव अन्स्ट असून ते शेटलँड्समध्ये आहे. युनायटेड किंगडमच्या उत्तरेकडील हा भाग आहे. येथे फारच कमी प्रमाणात लोकांचे वास्तव्य आहे. स्कॉटलंडपासून 212 मैल अंतरावर असलेल्या या बेटावरील लोकसंख्या 600-634 दरम्यान आहे. येथे राहणारे सर्व लोक परस्परांशी संबंधित आहेत. या बेटावर कुठलाही ट्रॅफिक सिग्नल नाही कारण बेटावरुन बाहेर जाण्यासाठी कुठलाच रस्ता नाही.

लोकांना कुठे जायचे असल्यास फेरी सेवेची मदत घ्यावी लागते. या बेटाला अन्य देशांशी संपर्क ठेवण्यासाठी केवळ 2 फेरीज आहेत. येथील मुले स्वत:च्या शाळेत फेरीद्वारेच जातात. या ठिकाणाचा प्रमुख ब्रिटिश नागरिक मायकल बॅट्स नावाचा व्यक्ती असून त्याच्यापूर्वी पापा रॉय यांच्याकडे ही जबाबदारी होती.









