सातारा / प्रतिनिधी
तालुका पोलीस ठाण्याच्या फोनला झाला बिघाड
तालुका पोलिसांच्यावर सद्या कामाचा लोड वाढला आहे.तालुका पोलीस ठाण्याच्या 02162-233949 हा आज दुपारी फोन बंद लागत होता.तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ऊस चोरीच्या गुन्ह्याबाबत तपास असलेले पोलीस नाईक राहुल राऊत यांना विचारणा केली असता अजून काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, जिहे येथून 1 लाख 70 हजार रुपयांचा ऊस चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की धर्मा खाशाबा सरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक श्रीरंग घोरपडे, दत्तात्रय श्रीरंग घोरपडे, दत्तात्रय रावसाहेब सरडे(सर्व रा.जिहे)यांनी दि.10रोजी 11.30ते दि.13च्या सकाळी 10 वाजेपर्यंत विजयनगर सातारा येथील गट नंबर 658 ब मधील 65 गुंठ्यातील 1 लाख 70 हजार रुपये किमतीचा 60 टन ऊस चोरुन नेला आहे.त्याचा तपास पोलीस नाईक राहुल राऊत हे करत आहेत.त्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या फोनवर फोन केला असता तो बंद लागला.तो सतत बंद असतो.
दरम्यान, तपास असलेल्या पो.ना.राऊत यांना मोबाईलवर फोन केला असता मी पोलीस ठाण्यात गेलोच नाही.काल एका मृत देहाकडे होतो आज एकाकडे आहे, मला एफआयआर काय आहे हेच माहिती नाही जाऊन पहातो, तालुका पोलीस ठाण्याचा फोन चालू असतो असे सांगितले. यावरून सातारा तालुका पोलीस ठाणे सध्या डिटेक्शनमध्ये पुढे गेल्याचे जरी दिसत असले तरी पोलीस ठाण्याच्या लॅण्डलाईन पासून कर्मचाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव आहे.







