सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
पालकमंत्री पदावर एवढी चर्चा का?;सरकारला मोठं बहुमत
आतापर्यंत सोन्या चांदीचे रस्ते व्हायला हवे होते
कोल्हापूरः
लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकारने लाख्या बहिणींना 2100 रुपये लगेच द्यायला हवे. सरकारकडून ज्या काही उलट सुलट चर्चा समोर येत आहे यावरूनच कळते सरकारमध्ये समन्वय नाही. फडणवीस सरकारला 60 दिवस झाले आहेत शंभर दिवसातले सात दिवस गेलेले आहेत आगे आगे देखेंगे होता है क्या ? पालकमंत्री पद आणि खातेवाटप याबद्दल त्यांचे साठ दिवस गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सात बारा कोरा करू असे स्टेटमेंट दिलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे साहेब त्यांनी सरसकट माफी द्यावी. राज्याच्या कृषिमंत्र्यांनी चार ते पाच महत्त्वपूर्ण विधान केले आहे ते मी सभागृहात बोलणार आहे. डीबीटी ची सुविधा असताना देखील सरकारने कॅश ट्रांजेक्शन करण्याचा निर्णय का घेतला? कृषिमंत्र्यांनी देखील कबूल केलेला आहे हार्वेस्टर घोटाळा झालेला आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
शक्तीपीठ महामार्ग बोलताना त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांमध्ये या शक्तीपीठ महामार्गाबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे.
हसन मुश्रीफ कर्जमाफी वक्तव्यावर म्हणाल्या, हे सर्व गोष्टी मला विचारण्याऐवजी मतदारांना सांगा. ते सर्वजण अशीच फसवा फसवी करतात. दिल्लीतले अनेक नेते म्हणाले आहेत एक चुनावी जुमला था. असे अनेक स्टेटमेंट आलेले आहेत. निवडणुका गांभीर्याने घेतो आम्ही लोकांना फसवण्यासाठी निवडून येत नाही. जनतेच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आम्हाला अपयश आलेला असेल तरी आम्ही नैतिकता सोडलेली नाही. मला त्यांच्या घरातील त्या महिलेचा सार्थ अभिमान आहे.ज्या पद्धतीने त्यांनी ईडीच्या विरोधात लढल्या संघर्ष केल्या. माझ्या नातवंडांचे दूध आल्याशिवाय मी केलेला घरात येऊ देणार नाही त्या म्हणाले मारायचा असेल तर गोळी मारा असे त्या म्हणाल्या.त्या घरात ईडीला पुरुष घाबरतो मात्र महिला घाबरत नाही.
बदलापूर केस संदर्भातील कारवाई बदद्ल बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये लढायला हवे. आरोपींना भर चौकात फाशी द्यायला हवी. ऑन पूजा चव्हाण संजय राठोड क्लिनचीट. नक्की काय झालं हे काळच ठरवेल. क्लीन चीट वॉशिंग मशीन चा हे सरकार आहे. सरकारने जरी क्लीन चीट दिलेली असली तरी जे सत्य आहे ते समोर यायलाच हवं यासाठी आम्ही कष्टाची पराकष्टा करू जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
पुढे बोलताना खासदार म्हणाल्या, शिवसेना आणि भाजप एकत्र असताना ते स्वभावावर लढत होते. मग आमच्याबरोबर आल्यावर स्वबळावर लढायची भाषा केली तर महाविकास आघाडीत कुठली असं बोलतात. आमचे सहकारी आणि आम्ही बसून फॉर्मुला ठरवू.
पुढच्या काही दिवसात आणखी गोष्टी महाग होणार आहेत. तिथे राहणाऱ्या भारतीयांना विजा संदर्भात काय करता येईल या संदर्भात प्रयत्न करूया, असे ट्रम्प पॉलिसीबद्दल त्या म्हणाल्या.
भुजबळ बोलताना त्या म्हणाल्या, अनेक सुखदुःखामध्ये आम्ही आणि भुजबळ एकत्र आहोत. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध काल आज आणि उद्या कायम जपले गेले. कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींचा मान सन्मान सगळ्यांनीच करायला हवा.
महाराष्ट्रातले असे अनेक टायगर आहेत जे म्हणजे ताडोबा मध्ये त्यांचे काय हाल झाले आहेत. ताडोबा मधले वाघ खरे आहेत. सध्या येथे उपस्थित असलेले वाघ देखील खरे आहेत मात्र दिल्ली समोर मुजरा करणाऱ्यांचं मला माहित नाही, असेही खासदार सुळे म्हणाल्या.
वाल्मीक कराड, धनंजय मुंडे याविषयी बोलताना म्हणाल्या, काही गोष्टी काढून घ्यायच्या नसतात त्यांच्यात नैतिकता असायला हवी. सगळा पक्षाची लोक सहा पक्ष आरोप करत असतात त्यावेळेस अंतरात्म्यानेच निर्णय घ्यायला हवा. त्यांच्यातला एक आरोपी आणखी फरार आहे. पुरावे असताना देखील अटक होत नाही. या सरकारला एवढा मोठा माइंडेड मिळाला आहे तुम्हाला हे देखील ते निर्णय का घेऊ शकत नाहीत हे कळत नाही .
पालकमंत्र्यावर एवढी चर्चा आयुष्यात मी कधी ऐकले नाही. एवढा मोठा माइंडेड असताना सरकार लगेच कामाला लागायला हवं होतं. सोना चांदीचे रस्ते आतापर्यंत व्हायला हवे होते. पालकमंत्री पद हे संविधानिक तरी आहे का? आता त्याला देखील सह पालकमंत्री लागले आहे. अनेक गोष्टी कायद्यानुसार नाहीत मात्र कधीच उप उप पद निर्माण झाले नाहीत. आमच्याकडे सत्ता होते तेव्हा राज्याची सेवा करण्यासाठी सरकार होतं स्वतःची सेवा करण्यासाठी नाही, असेही खासदार सुळे म्हणाल्या.









