पती सैन्यात ः इतरांना अन्न मिळण्यासाठी स्वतःचे पोट भरल्याचे नाटक
24 वर्षीय एना जैतसेवा स्वतःचा मुलगा शिवतोस्लाव आणि आई लारिसा आणि वडिलांसोबत मारियुपोलच्या एका भागात 60 दिवसांपर्यंत बंकरमध्ये राहिली. तिचे पती देशासाठी सीमेवर लढत आहेत. रशियाच्या युक्रेनवर हल्ल्यापूर्वी 5 लोकांचे छोटे कुटुंब होते, ज्यात 3 मांजरं आणि एक श्वान देखील होता. हे सर्वकाही मागे सुटले. आनंदाने भरलेल्या जीवनात अचानक उलथापालथ झाली. स्वतःच्या छोटय़ा मुलासोबत आणि वृद्ध आईवडिलांसोबत एनाने अवघड काळाला तोंड दिले आहे, याचा उल्लेख होताच आताही तिला अश्रू अनावर होतात.

एना स्वतःचे आईवडिल आणि 4 महिन्यांच्या मुलासमवेत बंकरमध्ये राहत होती. तेथे केवळ एकवेळचे जीवन मिळत होते. एना आणि तिच्या आईचे वजन सुमारे 9 किलोंनी कमी झाले. अन्नाच्या कमतरतेमुळे अनेक महिलांचे दात पडू लागले होते. मी कधीकधी पोट भरल्याचे नाटक करून माझ्या आईवडिलांना अन्न देण्याचा प्रयत्न करायचे असे एना सांगते.
बंकरमध्ये अजिबात पाणी नव्हते. पिण्यासाठी बर्फ वितळून किंवा पावसाचे पाणी वापरायचो. मुलाच्या अन्नासाठी पाणी मेणबत्तीवर गरम करावे लागत होते. एनाचा मुलगा बंकरमधील 18 मुलांपैकी एक होता. एनाचे पती किरिल हे युक्रेनच्या सैन्यात कार्यरत आहेत. रशियाच्या हल्ल्यात ते जखमी झाल्याची माहिती एनाला सैन्याने दिली.









