हरणांपासून बिबट्याचे पदचिन्हे अस्तित्वात
छत्तीसगडच्या कोरबा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील दुधीटांगरमध्ये पुरातत्व विभागाचे मार्गदर्शक हरिसिंह क्षत्रिय यांच्याकडून एका गुहेचा शोध लावण्यात आला आहे. यात 45 हून अधिक शैलचित्रे आढळून आली आहेत. ही चित्रे दगडांवर कोरण्यात आली आहेत. या चित्रांमध्ये हरिण, सांभर, श्वान, बकरी, बिबट्यासह अनेक प्राण्यांची पदचिन्हे आणि मानवी आकृतीसह ज्यामितीय चित्रे सामील आहेत.
ही गुहा ताम्रपाषाण युगातील असल्याचे हरिसिंह यांनी सांगितले आहे. त्यांनी या गुहेसंबंधी पुरातत्वतज्ञ के.के. मोहम्मद, कर्नाटकमधील पुरातत्वतज्ञ रवि कोरीसेट्टार, वाकणकर संशोधन संस्था, उज्जैनचे पदाधिकारी आणि पुरातत्व जाणकार विनीता देशपांडे यांना माहिती दिली आहे. ही शैलचित्रे पाहून ती ताम्रपाषाण युगातील असू शकतात, ज्यांचा संबंध ख्रिस्तपूर्व 4000 सालाशी असेल असे के.के. मोहम्मद यांनी म्हटले आहे.
हरिसिंह हे सातत्याने कोरबाच्या जंगलांमध्ये शोध घेत असतात. कोरबा जिल्ह्यात आदिमानवांच्या अनेक ठिकाणांचा शोध हरिसिंह यांच्याकडून यापूर्वी लावण्यात आला आहे. यापूर्वी हरिसिंह यांनी 25 नोव्हेंबर 2023 रोजी अशाच प्रकारच्या चित्रांचा शोध लेमरू गावात लावला होता. तज्ञांकडून दोन्ही शैलाश्रयांना मेसोलिथिक काळातील मानले जात आहे.









