वृत्तसंस्था/ टेक्सास
अमेरिकेतील टेक्सास येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यातील अमलापुरम शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत लोक मुम्मीदिवरमचे आमदार पी वेंकट सतीश कुमार यांचे नातेवाईक असून कार अपघातात ते दगावल्याची माहिती बुधवारी देण्यात आली. टेक्सासमधील क्लेबर्न सिटीमधील फार्म-टू-मार्केट रोड, हायवे 67 वर ट्रकची कारला धडक बसल्याने हा अपघात झाला. पी नागेश्वर राव, सीता महालक्ष्मी, नवीना, कृतिक, निशिता आणि आणखी एक व्यक्ती अशी मृतांची नावे आहेत. कारमधील एकमेव बचावलेला इसम लोकेश याला एअरलिफ्ट करून ऊग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे आमदारांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात आले.









