हैदराबाद
तेलंगणातील मंचेरियल जिह्यात शनिवारी एका घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. रामकृष्णपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटपूर गावात शनिवारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आगीचे कारण शोधले जात आहे. पहाटेच्या सुमारास भरवस्तीतील एका घराला आग लागली. आगीसंबंधीची माहिती मिळताच शेजाऱयानी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दल आणि पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र, आग मोठी असल्याने घरात झोपलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये घरमालक शिवाय (50), त्याची पत्नी पद्मा (45), मोनिका (23), पद्माच्या मोठय़ा बहिणीची मुलगी आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश आहे. आग लागली त्यावेळी घरात एकूण सहा जण उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी मोनिका (भाची), तिची दोन मुले आणि एक नातेवाईक त्यांच्या घरी आले होते.









