रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीतील शिवाजीनगर परिसरातील सिद्धीविनायक नगर येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात पोलिसांनी आखणी ६ जणांना अटक केल़ी यामध्ये एका महिलेचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आह़े यापूर्वी पोलिसांनी मुख्य आरोपीसह चौघांना अटक केली होत़ी त्यानुसार अटकेतील संशयितांची संख्या आता 10 वर पोहचली आह़े वेश्याव्यवसाय करणारे एका मोठ्या रॅकेटची पाळेमुळे पोलिसांकडून खणून काढली जात आहेत़.
अरबाज असलम चाऊस (ऱा साखरतर रत्नागिरी), साईप्रसाद साळुंखे (ऱा कोकणनगर, रत्नागिरी), रोहन मंगेश कोळेकर (ऱा शिवाजीनगर रत्नागिरी), प्रवीण प्रकाश परब (ऱा गवळीवाडा रत्नागिरी), नविद अश्रफ कनवाडकर (ऱा उद्यमनगर रत्नागिरी), सलवा सादीक नावडे (ऱा मिरकरवाडा रत्नागिरी) अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ तर यापूर्वी पोलिसांनी मुख्य आरोपी राजेंद्र रमाकांत चव्हाण (45,ऱा मिरजोळे जांभूळफाटा रत्नागिरी), अब्दुल मतीन हसनमियॉं डोंगरकर (36, ऱा माळनाका रत्नागिरी), ओमकार जगदीश बोरकर (26, ऱा चिंचखरी रत्नागिरी), समीर मंगेश लिंबुकर (23, ऱा आरोग्यमंदीर रत्नागिरी) या संशयितांना अटक केली होत़ी
दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 14.20 वा. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाद्वारे रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरामधील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये छापा टाकला होत़ा यावेळी राजेंद्र चव्हाण हा दोन पर राज्यातील महिलांना वेश्यागमनाकरिता ठेवून आपल्या भाड्याच्या फ्लॅट मध्ये वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवत असल्याचे आढळून आले होत़े राजेंद्र याला अटक करण्यात आल्यानंतर अन्य संशयित आरोपींची नावे देखील समोर आल़ी.
खेडमध्ये फार्महाऊसमध्ये वेश्या व्यवसाय; महिलेसह एकास अटक
रत्नागिरी पाठोपाठ खेडमध्येही वेश्या व्यवसाया प्रकार उघडकीस आला आहे. वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या रवींद्र गणपत गावडे 50 वर्षीय प्रौढासह महिलेस येथील पोलिसांनी शनिवारी अटक केली. तालुक्यातील चिंचघर-वेताळवाडी येथील दवबिंदू फार्महाऊसवर वेश्या व्यवसाय सुरू होता. संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात सर्व संशयितांविरूद्ध भा.दं.वि.सं. कलम 370 व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल़ा पोलिसांकडून ही कारवाई शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक, शितल पाटील, हवालदार, वैष्णवी यादव, राजेंद्र सावंत, मंगेश शिवगण,अरुण चाळके, अमोल भोसले, पोलीस नाईक, वैभव शिवलकर, आशिष भालेकर,पंकज पडेलकर, कॉन्स्टेबल किरण डांगे, विक्रांत कदम व राजेंद्र फुटक यांनी केल़ी









