वृत्तसंस्था /भुवनेश्वर
ओडिशातील जाजपूर रोड रेल्वेस्थानकावर मालगाडीने धडक दिल्याने सहा मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी हे मजूर मालगाडीखाली बसले होते. मालगाडी चालू झाल्यानंतर त्यांना बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख ऊपयांची भरपाई जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यातच ओडिशामध्ये भीषण तिहेरी रेल्वे अपघातात जवळपास 275 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही नवी दुर्घटना घडली आहे.









