मिसिसिपी
अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. टेनेसी राज्यातील मिसिसिपी शहरात शुक्रवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील हल्लेखोर आरोपीला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली आहे. 52 वषीय रिचर्ड डेल क्रूम या हल्लेखोराने सुरुवातीला आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर नातेवाईकांवरही गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलीस अधिकारी ब्रॅड लान्स यांनी सांगितले. गोळीबारानंतर हल्लेखोराने आपले घर गाठले. पण, तत्पूर्वी आपल्या शेजारी राहणाऱया दोघांची गोळीबार करत हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.









