प्रतिनिधी/ बेंगळूर
कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहेत. कोप्पळ जिल्ह्याच्या कुष्ठगी तालुक्यातील कलकेरीजवळ रविवारी ही घटना घडली आहे. राजप्पा बनगोडी, राघवेंद्र, अक्षय शिवशरण, जयश्री, राखी आणि रश्मिका अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. इंडिका कारचे टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. विजापूरहून बेंगळूरला जाताना ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद कुष्ठगी पोलीस स्थानकात झाली आहे.









