खेड :
मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यानजीक झालेल्या अपघातात वॅगनार कारमधील 6 जण जखमी झाले. 6 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भरत प्रभाकर पवार (रा.वेरळ, खेड) या वॅगनार कारचालकावर गुरुवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संतोष आनंद घाडगे, नीलम संतोष घाडगे (रा. कल्याण–ठाणे), राजेश हिरालाल मोहील यांच्यासह जयश्री अरविंद बारिया, रोशन अरविंद बारिया, जयश्री अरविंद बारिया अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. संतोष घाडगे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ते आयटेन स्पोर्टस व्हॅन (एम.एच.05/सी.एम.4658) घेवून कशेडी बोगदा पार करुन पुढे 1 कि.मी. अंतरावर आले. याचदरम्यान, भरत पवार हा वॅगनार कार (एम.एच.05/एफ.पी.7514) घेऊन जात असताना व्हॅनला धडक दिली. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. कशेडी येथील वाहतूक पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले.








