मुंबई :
आघाडीवरच्या दहा कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये वाढले असल्याचे दिसून आले आहे. आघाडीवरच्या सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 70 हजार 527 कोटी रुपयांनी वाढले आहे.
मागच्या आठवड्यात या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी बाजार भांडवलामध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. हिंदुस्थान युनिवर लिमिटेड, भारती एअरटेल, आयटीसी, आयसीआयसीआय बँक यांच्या बाजार भांडवलातदेखील वाढ झाली आहे तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये घसरण दिसून आली आहे. मागच्या आठवड्यात बीएसई निर्देशांक 287 अंकांनी वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 22191 कोटी रुपयांनी वाढून 15,90,408 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने 17222 कोटी रुपयांची भर मागच्या आठवड्यामध्ये भांडवलात घातली आहे तर भारती एअरटेलने 16963 कोटींची भर भांडवलामध्ये घातली आहे.









