नवी दिल्ली : आसाम- मेघालय सीमेवर झालेल्या गोळीबारात सहा जण ठार झाले असून यामध्ये मेघालय राज्यातील ५ आणि आसाम राज्याच्या एका वनरक्षकाचा समावेश आहे. या संबंधीत घटनेची माहीती मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी दिली. मेघालय पोलिसांनी या घटनेचा एफआयआर दाखल केला असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पोलीसांच्या अहवालानुसार, लाकूड वाहून नेणाऱ्या ट्रकचा आसाम पोलिस आणि आसाम वनरक्षकांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले होते. ही माहीती मिळताच मुक्रोह गावातील लोक मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी पोलीस आणि वनरक्षकांना घेरले.
आसामचे मुख्यमंत्री संगमा यांनी या घटनेची माहीती देताना म्हटले कि, ” मुक्रोह गावात घडलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि आसामचे वनरक्षक यांच्याप्रती मी मनापासून शोक व्यक्त करत आहे.” मेघालय पोलिसांनी चौकशी करून एफआयआर नोंदवला आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर, मेघालय सरकारने २२ नोव्हेंबरपासून राज्यातील ७ जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद केली आहे. जयंतिया हिल्स आणि खासी टेकड्यांच्या क्षेत्रात मेघालय सरकारने आज खालील अधिसूचना जारी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









