नवी दिल्ली : “ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्याचा देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन 01 ऑक्टोबर 2023 पासून कारमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे.” असे केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे.
परिवहन मंत्रालया्च्या वेबसाइटनुसार M1 श्रेणी म्हणजे प्रवासी वाहतूक करणार्या वाहने होय. ज्यात चालकाच्या आसनासह आठ पेक्षा ज्यादा जागा नसतात. केंद्र सरकारने या वर्षी १ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याची योजना आखली होती.
आपल्या पोस्टमध्ये अधिक माहिती देताना गडकरी म्हणाले “ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्याचा आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, 01 ऑक्टोबर 2023 पासून पॅसेंजर कारमध्ये (M-1 श्रेणी) किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,”. या निर्णयाद्वारे मोटार वाहनामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला अग्रक्रम देऊनच हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









