वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष करामध्ये विक्रमी वाढ झाली असून 10 ऑगस्टपर्यंत या माध्यमातून 6.53 लाख कोटी ऊपये जमा झाले आहेत. गेल्या वषीच्या तुलनेत यंदाच्या प्रत्यक्ष करामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष करांचे संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 17.33 टक्के अधिक आहे. त्याचवेळी हा आकडा संपूर्ण आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या 32.03 टक्के इतका आहे. याचा अर्थ 2023-24 च्या संपूर्ण आर्थिक वर्षात सरकारच्या अंदाजे कमाईपैकी 32 टक्क्मयांहून अधिक रक्कम 10 ऑगस्टपर्यंतच तिजोरीत आली आहे.









