टोकियो
जपानच्या इशिकावामध्ये रविवारी 6.5 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे एका इसमाचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारतींचे देखील नुकसान झाले आहे. जपानमध्ये मागील काही काळापासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. जपान हा देश भूकंपप्रवण भागात मोडतो.









