टोकियो :
जपानच्या इशिकावा प्रांतात शुक्रवारी भूकंप झाला आहे. भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.12 वाजता (जपानच्या वेळेनुसार दुपारी 2:42 वाजता) भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपानंतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त मिळालेले नाही. त्याचबरोबर त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आलेला नाही. मात्र, बऱ्याच दिवसांनंतर जाणवलेल्या या मोठ्या धक्क्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरल्याचे दिसून आले.









