तैपेई / वृत्तसंस्था
तैवान आणि जपानच्या किनारी भागात सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तैवानच्या पूर्व किनारपट्टीला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर तैपेईमधील इमारती काही सेकंद हादरल्या. परंतु नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या पूर्व किनाऱयाजवळ, हुलियन कौंटीचा किनारा आणि दक्षिणेकडील जपानी बेट योनागुनी दरम्यान जमिनीखाली 27.5 किमीवर होता, अशी माहिती भूकंपमापन केंद्रातील अधिकाऱयांकडून देण्यात आली.









