तैपेई
तैवानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. तैवानमध्ये सोमवारी रात्री उशिरा 80 हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र काउंटी हुलिएनमध्ये 5.5 किलोमीटर खोलवर जमिनीत होते. या भूकंपामुळे एक इमारत कोसळली आहे. जपान, चीन आणि फिलिपाईन्समध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी तैवानमध्ये 3 एप्रिल रोजी 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता आणि यात 14 जणांचा मृत्यू ओढवला होता.









