अंकारा
तुर्कियेच्या बालिकेसिर प्रांतात सोमवारी रात्री उशिरा 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे तीन इमारती जमीनदोस्त झाल्या असल्या तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या भूकंपाचे केंद्र सिंदिरगी शहरात होते. तर भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 6 किलोमीटर खोलवर होता. इस्तंबुल, बुरसा, मनीसा आणि इजमिर शहरातही भूकंपाचा प्रभाव दिसून आला आहे. भूकंपाच्या भीतीने लोकांनी घरात जाणे टाळले आहे.









