ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर 6 फेबुवारीला देशभरात राष्ट्रीय आणि राज्यमार्गावर दुपारी 12 ते 3 यावेळेत ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय किसान युनियनचे (आर) नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी ही घोषणा केली आहे.
मागील 2 महिन्यांहून अधिक दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी प्रजासत्ताक दिनादिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर पुन्हा एकदा सरकारला धक्के देणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी गझीपूर आणि टिकरी बोर्डरवरील रस्त्यांवर मोठमोठे खिळे लावून रस्ता वाहतूक पुर्णपणे बंद राहील, अशी तरतूद केली आहे.
आंदोलनस्थळाभोवतालचे रस्ते ब्लॉक करून सरकारने इंटरनेट, वीज आणि पाणी यासारख्या सेवाही या भागात बंद ठेवल्या आहेत.









