माही, ओमकार, शुभश्री, कृष्णा यांना वैयक्तिक विजेतेपद
बेळगाव : बेळगाव जिल्हा कराटे संघटनेच्यावतीने आयोजित पाचवी राष्ट्रीय कराटे स्पर्धे कृष्णा देवगाडा, माही कंग्राळकर, ओमकार पाटील, शुभश्री मिराशी यांनी आपल्या गटात वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. समुदाय भवन, शिवबसव नगर, बेळगाव येथील स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या जिल्हा व राज्यांमधून एकूण 1870 कराटेपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये नॅशनल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबचा मानकरी मुलांच्या गटात कृष्णा देवगाडी तर मुलींच्या गटात माही कंग्राळकर यांनी पटकाविला. त्यांना 10 हजार रुपये व चषक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. बेळगाव जिल्हास्तरीय स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब मुलांच्या गटात ओमकार पाटील तर मुलींच्या गटात शुभश्री मिराशी यांनी पटकाविला. त्यांना 5 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे शीतल भोगण्णवर, राघवेंद्र होनगल यांच्या हस्ते विजेत्या कराटेपटूंना शाल व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर, उपाध्यक्ष रमेश अलगुडेकर, जनरल सेक्रेटरी जितेंद्र काकतीकर, खजिनदार दिपक काकतीकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, हरीष सोनार, अक्षय परमोजी, नताशा अष्टेकर, परशराम नेकनार, विनायक दंडकर, लक्ष्मीकांत आनंदाचे, राजु राजपुत, चंदन जोशी, मल्लिकार्जुन नडुगेरी, अमित वेसणे, दीपिका भोजगार, मनिष नेसरीकर, प्रमोद इळिगेर, संतोष तेलंग, अश्विनी तेलंग आणि उषा गौडर यांनी परिश्रम घेतले.









