लखनौ :
शाळेतून घरी परतणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थिनीचे दोन युवकांनी अपहरण केले, आरोपींनी तिला एका हॉटेलमध्ये नेत तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच या कृत्याचे चित्रिकरणही केले आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी सरोजनीनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. दानिश अन् अमीन या दोघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून लवकरच आरोपींना अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.









