ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कार्यान्वित होणाऱ्या 5G तंत्रज्ञानाविरोधात अभिनेत्री जूही चावलाने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तिला संक्षिप्त नोट दाखल करण्यास सांगितले आहे.
भारतात लवकरच 5G तंत्रज्ञान कार्यान्वित होणार आहे. त्याचा पर्यावरणावर तसेच लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे जुहीने 5G तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली हायकोर्टात सोमवारी याचिका दाखल केली आहे. त्यावर आज दुसऱ्यांदा सुनावणी झाली.
जूहीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, भारतात 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होण्यापूर्वी सर्वसामान्य लोकांचे आरोग्य, पशु, पक्षी आणि पर्यावरण या बाबींवर या तंत्रज्ञानाचे काय परिणाम होतील, याचा बारकाईने अभ्यास करावा. त्यानंतरच भारतात या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचा विचार करावा. कारण 5G टॉवरसमधील किरणोत्सर्ग लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत हानिकारक आहे.
न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांनी जुहीला याचिकेवर 2 पानांची संक्षिप्त नोट दाखल करण्यास सांगितले आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू करण्यासह चावला आणि इतर दोन याचिकाकर्त्यांच्या चार अर्जांवर विचार करणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.









