ऑनलाईन टीम नवी दिल्ली
अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेट सेवांसाठीची 5G स्पेक्ट्रमचा लिलावाच्या चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी केलेल्या बोलींमध्ये 16 फेऱ्यांमध्ये 1,49,623 कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील 1800 मेगाहर्ट्झ बँडच्या स्पेक्ट्रमसाठी तीव्र स्पर्धेमुळे जिओ आणि एअरटेलने बुधवार आणि गुरुवारी बोली लावली होती. त्यांनी आपली बोली टिकवून ठेवून अपेक्षेपेक्षा जास्त वाढवली.
अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा रिलायन्स जिओ, सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया तसेच अब्जाधीश गौतम अदानी यांच्या प्रमुख अदानी एंटरप्रायझेस हे मुख्य स्पर्धक 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावण्याच्या शर्यतीत आहेत.
पहिल्या दिवशी ईच्छूक कंपन्यांनी 1.45 लाख कोटी रुपयांची उलाढाल केल्यानंतर मंगळवारी पुन्हा बोली सुरू झाल्या. त्यानंतर बुधवार आणि गुरुवारच्या तुलनेत याची संख्या वाढत गेलेली दिसून येते. 16 फेऱ्यांमध्ये 1,49,623 कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या.