ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दूरसंचार विभागाने 5G तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम चाचण्यांना परवानगी दिली आहे. भारतातील विविध ठिकाणी दूरसंचार सेवा पुरवठादार 5G चाचण्या सुरू करतील. ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागात या चाचण्या घेण्यात येतील, असे दूरसंचार मंत्रालयाने मंगळवारी सांगितले.









