बेंगळूर
बांधकाम क्षेत्रात असणारी बेंगळूरची कंपनी श्रीराम प्रॉपर्टीज यांनी आपला पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. 16.6 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे. वर्षाच्या मागे याच कालावधीतील तुलनेत नफा 59 टक्के अधिक आहे. दुसरीकडे कंपनीच्या महसुलात मात्र आठ टक्के इतकी घट झाली आहे. तो 157 कोटी रुपयांवर राहिला आहे. वर्षाच्या मागे याच कालावधीत 170 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. पहिल्या तिमाहीत घर विक्रीच्या माध्यमातून 459 कोटी रुपयांची प्राप्ती कंपनीने केली आहे.