राधानगरी तालुक्यातून हजारो भक्तांची उपस्थिती
तालुक्यातील अनेक भक्तांनी लाभ घेतला
कोल्हापूर
संत निरंकारी मंडळ दिल्ली यांच्या वतीने भारतीय सनातन संस्कृतीची जाण ठेवून मानवता धर्म आणि माणुसकी हीच पूजा याला अनुसरून संतनिरंकारी मंडळाचा 58 वा वार्षिक संत समागम पुणे येथे संपन्न झाला. याकरिता राधानगरी तालुका व परिसरातून हजारोहुन अधिक भक्तगणं या ठिकाणी पोहोचून सदगरू माता सुदीक्षा महाराज यांचा आशीर्वाद घेतला, गेली अनेक वर्ष दर आठवड्यामध्ये सोमवारी राधानगरी येथे अशा प्रकारचे सत्संग सुरू असतो, त्याचाही भाविकांनी लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये संतांनी आणि ग्रंथांनी दिलेल्या शिकवणी नुसार जीवन जगावे आदी मुद्द्यांचा वापर करून जीवन सुंदर बनवावे असे आवाहन सद्गुरु माताजी यांच्यावतीने करण्यात आले, राधानगरी-गारगोटी ब्रँच मुखी महात्मा प, आ, रवींद्र देसाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तनी या समागमाचा लाभ घेतला.
यावेळी प्रबधंक दिलीप सोनुले, दादासो सांगावकर,कृष्णात हातकर, बाळासो गायकवाड,रवींद्र पोतदार,राजू चौगले, संदीप हातकर, बाजीराव पाटील, सर्जेराव पाटील, सुरेखा गायकवाड, वंदना सुतार, सुनीता पाटील, सुमन लिंग्रस यांच्यासह अनेक भक्त,भगिनी या समागमात सहभागी झाले होते.
Previous Articleमहाराष्ट्राची ‘इंडस्ट्री प्रेंडली स्टेट’ म्हणून ओळख
Next Article पूरस्थिती नियंत्रण प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण करा








