वृत्तसंस्था/ कोलकाता
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी प्राप्तीकर विभागाने देशभरात धाडी घालण्यास प्रारंभ केला आहे. कोलकाता येथे घातलेल्या धाडीत एका उद्योगपतीच्या कार्यालयातून 58 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हा उद्योगपती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. तथापि, तृणमूल काँग्रेसने या धाडीवर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या एका मंत्र्याच्या घरावरही गेले सलग तीन दिवस धाडी घातल्या गेल्या आहेत, असे प्रतिपादन या पक्षाने केले आहे. या धाडी हे केंद्र सरकारचेच कारस्थान असून विरोधी पक्षांच्या सरकारांना लक्ष्य केले









