एकाला अटक, महिंद्रा वाहन जप्त : अबकारी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
गोव्यावरून महाराष्ट्राकडे महिंद्रा एक्सयुव्ही वाहनातून दारू घेऊन जाणाऱया वाहनाला अबकारी खात्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन 58 लाख 560 रुपयांची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. प्रतीक अशोक माळी (रा. कोल्हापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे.
गोव्यातून कारमधून मोठय़ा प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली. अबकारी खात्याच्या अप्पर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी पोलिसांनी कणकुंबीजवळ नाकाबंदी करून दारू जप्त केली आहे. विविध कंपनीच्या 167 बॉटल त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. एमएच 04 एफएम 2009 यामधून संशयित आरोपी प्रतीक दारू आणत होता.
यावेळी अबकारी खात्याच्या पोलिसांनी त्याचे वाहन अडविले. तपासणी केली असता दारू आढळून आली. अबकारी अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, साहाय्यक अप्पर आयुक्त फिरोज खान, अबकारी उपायुक्त जयरामेगौडा, अबकारी उपअधीक्षक सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली, एम. एफ. कटगण्णावर यांनी ही धाड घातली. या कारवाईत अबकारी कॉन्स्टेबल बी. एस. अट्टीगल, ए. आय. सय्यद यांच्यासह खानापूर अबकारी विभाग पोलिसांनी भाग घेतला होता.









