विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीत एकूण 58 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तिसऱ्या यादीसह विधानसभेच्या 200 जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपने 182 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या तिसऱ्या यादीत नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले दर्शनसिंग गुर्जर आणि सुभाष मील यांनाही तिकीट देण्यात आले आहे. या दोघांनीही काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने करौलीतून दर्शनसिंग गुर्जर यांना तर खंडेलामधून सुभाष मील यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय भाजपने एकमेव मुस्लीम चेहरा युनूस खान यांचे तिकीट रद्द केले आहे. युनूस खान हे डिडवाना येथून भाजपचे उमेदवार होते. त्यांना आता तिकीट दिलेले नाही.









