चॅम्पियनशिपमध्ये 3 सुवर्ण
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातचे 56 वर्षीय पॉवरलिफ्टर ललित पटेल यांनी थायलंडमधील पटाया येथे झालेल्या आयबीबीएफ वर्ल्ड पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके पटकवण्याचा पराक्रम केला.
मास्टर टू कॅटेगरीत (83-93 किलो) भाग घेत पटेल यांनी 10 ते 12 मे दरम्यान झालेल्या स्पर्धेत बेंच प्रेस, डेडलिफ्ट आणि स्क्वॅट इव्हेंटमध्ये पोडियमवर अव्वल स्थान पटकाविले. जागतिक स्पर्धेची तयारी करण्यासाठी पटेल गेल्या आठ महिन्यांपासून सखोल प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी फक्त पाच वर्षांपूर्वी पॉवरलिफ्टींग स्वीकारले आणि ते कठोर शाकाहारी आहाराचे पालन करतात. वय आणि आहार यशात अडथळा नाहीत, असे पटेल म्हणाले. गेल्या काही वर्षांत पटेल यांनी 16 जिल्हास्तरीय, 18 राज्यस्तरीय आणि 12 राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. या आंतरराष्ट्रीय कामगिरीसह ते आता तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची आणि स्पर्धात्मक शरीरसौष्ठव शोधण्याची योजना आखत आहेत.









